घटस्फोट प्रत्येक वेळी दुःखदच असेल असं नाही, मात्र तो बऱ्याच जणांना नेहमीच दुर्दैवी, तर काहींना चुकीचा वाटतो. हा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे

या पुढे घटस्फोटाचं प्रमाण वाढतच जाणार, यात शंका नाही. पुढच्या दोन-तीन पिढ्यांत तर हे प्रकार खूप सर्रास होतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, घटस्फोटामुळे खरंच सगळं काही वाईट होणार असतं का? तर नक्कीच नाही! कधी कधी घटस्फोट झाल्यानं माणसं सुखीही होतात, त्यांची प्रगती होते किंवा तब्बेत ठीक होते, अशीही उदाहरणं आहेत. एखाद्या माणसाला स्वतःच्या आयुष्यात बोलावून, त्याला नंतर निरोप द्यावा लागणं, हे सोपं नक्कीच नाही.......